राज्यातील उद्योग गुजरातला पाठविणाऱ्या ट्रिपल इंजिन सरकारला रेल्वेने गुजरातला केले रवाना…. राष्ट्रवादीने शरद पवार गटा तर्फे अनोख्ये आंदोलन

अमळनेर प्रतिनिधी, येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे ट्रीपल इंजिन सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या चेहऱ्याचे मुखवटे घालून रेल्वेने गुजरात रवानगी करण्याचे अनोखे आंदोलन करण्यात आले.

राज्यात बेरोजगारीचां महापूर वाहत असताना राज्यातील मोठ मोठाले प्रकल्प गुजरातच्या घशात ओतणाऱ्या ट्रिपल इंजिन सरकारला कायम स्वरुपी गुजरातलाच पाठवा व राज्यावर आलेले संकट कायमस्वरूपी हटवा,असे आवाहन युवक अध्यक्ष परेश शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्या सह आंदोलन करताना केले. आंदोलन प्रसंगी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांचे मुखवटे घालून सोबत बॅग देऊन रवाना करण्यासाठी अमळनेर रेल्वे स्थानकावर जमले होते.

राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस तिलोत्तमा पाटील..

महिंद्रा अँड महिंद्रा, वेदांता, फॉस्कोर्न, टाटा एअर बस तसेच चाकण मधील तब्बल ५० कंपन्यांनी गुजरातला जाण्याचा निर्णय घेतला असताना खोके सरकार गप्पा का ? याला जबाबदार कोण असा सवाल राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीस तिलोत्तमा पाटी यांनी यावेळी उपस्थित केला.

शहर अध्यक्ष श्याम पाटील……

राज्य सरकारचे गुजरात वरील प्रेम पाहता या तिघांनी बॅग भरून गुजरातला राहायला जावे . त्यासाठी त्यांची बॅग भरून तयार आहे तसेच त्यांच्या तिकिटांची देखील व्यवस्था आम्ही केली आहे.

आंदोलन वेळी महिला तालुका अध्यक्ष कमल पाटील, ग्रंथालय नियोजन समिती सदस्य रिता बाविस्कर, युवक उपजिल्हाअध्यक्ष अनिरुद्ध शिसोदे, विद्यार्थी प्रदेश सरचिटणीस वेदांशू पाटील, अक्षय चव्हाण, शुभम पवार, आरती पाटील, रोशनी पाटील, योगेश शिसोदे, दिपक पाटील, वैभव पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!