अमळनेर येथील भूमिपुत्र आमदार अनिल भाईदास पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पक्ष संघटनेच्या वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती देण्यात आली आहे.सदरची नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा सुनिल तटकरे यांनी केली आहे. सोबतच जळगाव,धुळे व नंदुरबार या तीन जिल्ह्याचे संघटनेचे प्रभारी म्हणून देखील जवाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या “वरिष्ठ उपाध्यक्ष” पदी नियुक्ती झाल्याबद्दल तसेच जळगाव, नंदुरबार व धुळे जिल्ह्यांच्या पक्ष संघटनेच्या प्रभारी पदाची जबाबदारी मिळाल्या बद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय येथे घोषणा देत फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जळगाव जिल्हा युवकाध्यक्ष भूषण भदाणे, सोनू पाटील, योगेश पाटील, प्रदीप पाटील, सागर पाटील, निनाद शिसोदे, सागर पाटील, निलेश देशमुख, अमोल पाटील, राहुल गोत्राळ, योगेश पाटील, विपुल पाटील, वाल्मिक पाटील आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते!
