सेवा निवृत्त कर्मचारी वाऱ्यावर तर लेखा विभाग तोऱ्यावर–रघुनाथ मोरे, सचिव,अ.भा. सफाई मजदूर काँग्रेस, नगरपालिका शाखा अमळनेर

 

अमळनेर नगरपरिषदेची आर्थिक परिस्थिती खालावली आहे अशी लेखी कबुली राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाला देणाऱ्या अमळनेर नगरपरिषदेत पैशांची उधळपट्टी होत असताना पालिकेच्या आर्थिक परिस्थिती अचानक सुधारली की काय..?

अमळनेर नगरपरिषदेच्या लेखा विभागात फर्निचर चे काम करण्यात येत आहे.अगदी शनिवार सुटीचा दिवस असतानाही फर्निचर चे काम जोमाने सुरू होते.विशेष म्हणजे या कामासाठी कोणतीही निविदा काढण्यात आलेली नाही. यामुळे अमळनेर नगरपरिषदेत पैशांची उधळपट्टी होत असल्याचे स्पष्ट आहे. फर्निचरच्या कामाचे बिल कोण व कसे अदा करणार..?कारण पालिकेची आर्थिक परिस्थिती बेताची आहे.यात ठेकदार तर मेहेरबान झाले नाहीत ना..?
सेवा निवृत्त झालेल्या सफाई कामगारांना सेवा निवृत्ती नंतरच्या रक्कमा अदा का केल्या जात नाही अशी विचारणा राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाने अमळनेर नगरपरिषदेला केली होती. यावर उत्तर देताना “अमळनेर नगरपरिषदेची आर्थिक परिस्थिती योग्य नसल्याने सेवा निवृत्त सफाई कामगारांना त्यांच्या हक्काच्या सेवा निवृत्ती नंतरच्या रक्कमा देता येणे शक्य होत नाही.”असा खुलासा अमळनेर नगरपरिषदेने केला होता.
गरीब झालेली (?) अमळनेर नगरपालिका कोणतेही टेंडर न काढता लेखा विभागातील आधीचे चांगल्या स्थितीत असलेल्या फर्निचरला भंगार समजून नव्याने फर्निचर बनवत आहे. *दाल मे कुछ काला है* अशी शंका येते. *”माझे बील मंजूर करा,मी फर्निचर बनवून देतो.”* अशी ऑफर कोणा ठेकेदाराने तर दिली नाही ना..?
यात भरडला जात आहे सेवा निवृत्त सफाई कामगार व सेवा निवृत्त कार्यालयीन कर्मचारी. सेवानिवृत्त झालेल्या कामगारांच्या शारीरिक हालचाली मंदावतात. म्हणून तर एका विशिष्ट वयानंतर त्यांना सेवानिवृत्त केले जाते. अनेक व्याधी, आजारपण सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जडतात. या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे शारीरिक हाल व्हावेत असा धक्कादायक प्रकार अमळनेर नगर परिषदेत खुलेआम झाला आहे.
▪️ पहिल्या मजल्यावर असलेल्या लेखा विभागात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या पेन्शन व तत्सम कामासंदर्भात पेन्शन लिपिक यांची बैठक व्यवस्था होती. पण…कुठे माशी शिंकली कोण जाणे..ज्येष्ठ झालेल्या सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन संबंधित कामासाठी आता तिसऱ्या मजल्यावर पायऱ्या जावे लागणार आहे.(लिफ्ट बंद..) कोणाला मधुमेह आहे,कोणाला हृदयविकार आहे,कोणाला रक्तदाबाचा त्रास आहे,तर कोणाला अन्य शारीरिक व्याधी..आजार आहेत. पेन्शन लिपिकचे दालन तिसऱ्या मजल्यावर स्थलांतरित झाल्याने सेवानिवृत्तीच्या रकमासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तीन मजले चढउतार करावे लागणार आहे.*पायऱ्या झिजवणे* अशी मराठीत एक म्हण आहे. ते म्हण सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत तंतोतंत खरी ठरत आहे.
▪️ याबाबत झालेल्या तक्रारीची तातडीने दखल घेवून *मा.जनार्दन पवार साहेब,सहा.आयुक्त,न. वि.शाखा,जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांनी दिनांक २१/०२/२०२५ रोजी पत्र क्रमांक न.प.शाखा/जिप्रक -४/ई-ऑफिस/३४३०१६४९/२०२५* अन्वये मुख्याधिकाऱ्यांना निमयोजित कार्यवाही करणेबाबत आदेश दिले आहेत.पण.. वरिष्ठांचे आदेशांना केराची टोपली दाखवली जात आहे. कारण.. नगरपरिषद विशेष शाखेच्या सहाय्यक आयुक्तांनी आदेश देऊनही लेखा विभागात फर्निचरचे काम शनिवार सुट्टीच्या दिवशी देखील सुरूच होते.विशेष म्हणजे लेखा विभागात अत्यंत महत्त्वपूर्ण कागदपत्रे असताना फर्निचरचे कामात काही कागदपत्रे लंपास किंवा नष्ट तर होत नाहीत ना..? याचा विचार देखील झालेला नाही.
▪️ मुख्याधिकारी साहेब आपला वाढदिवस पालिकेतील ठराविक अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत (ठेकेदार पण होते म्हणे..) इंदिरा भवन येथे जंगी भोजनावळी देवून शनिवारी साजरा करत होते. वाढदिवशी भोजनावळी साठी भला मोठ्ठा मोठ्ठा मोठ्ठा खर्च झाला म्हणे..
आता वाढदिवस साहेबांचा..त्यांनी कसा साजरा करावा हा त्यांचा खाजगी प्रश्न..आमच्या पोटात का म्हणून दुखावे..नाहीच दुखत हो..आम्ही फक्त शनिवारी सुट्टीच्या दिवशी देखील एका विभागातील फर्निचर चे काम सुरू असल्याबाबत.. सहाय्यक आयुक्त नगरपालिका विशेष शाखेने दिलेल्या आदेशाची माहिती मुख्याधिकाऱ्यांना व्हाट्सअप वर पाठवली. पण.. वाढदिवसाच्या रंगलेल्या कार्यक्रमात रमलेले साहेब अगदी शांत..शांत..शांत..
*आदेश येतात आणि जातात.. कागदाचा तुकडाच तो* तसेच झाले साहेब निराकार… लेखा विभाग..दमदार असतो ना.. कॅबिन पूर्ण नवीन तयार झाले पण..
हम बोलेंगे तो बोलते है की बोलता है..आगे आगे देखो होता है क्या..
सेवा निवृत्त कर्मचारी वाऱ्यावर..लेखा विभाग तोऱ्यावर…

______रघुनाथ मोरे______
सचिव – अ.भा. सफाई मजदूर काँग्रेस, नगरपालिका शाखा अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!