अमळनेरकरांना मिळणार शुद्ध पाणी! वर्षानुवर्षे रखडलेल्या जलकुंभांच्या साफसफाईचा धडाका सुरू

अमळनेर : अमळनेरकरांच्या आरोग्याशी निगडित असलेला आणि गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला जलकुंभांच्या (पाण्याच्या टाक्या) साफसफाईचा प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासकीय नियोजनाच्या जोरावर शहरात शुद्ध पाणीपुरवठ्याची ऐतिहासिक मोहीम हाती घेण्यात आली आहे. मागील आठवड्यात कोर्टमागील जलकुंभ यशस्वीरित्या साफ केल्यानंतर, आता तांबेपुरा जलकुंभाच्या स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. टप्प्याटप्प्याने शहरातील सर्वच जलकुंभ चकाचक केले जाणार आहेत.

​दिलेला शब्द पाळला! सभापती कैलास पाटील यांच्यावर कौतुकाचा वर्षाव

​गेल्या अनेक वर्षांपासून या पाण्याच्या टाक्यांमध्ये साचलेला गाळ आणि अस्वच्छता साफ करण्याचे धाडस कोणी केले नव्हते. मात्र, नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती कैलास नामदेवराव पाटील यांनी पदभार स्वीकारताना शहरवासीयांना दिलेला शब्द पाळला आहे. आधी कोर्टमागील आणि आता तांबेपुरा जलकुंभाचे काम सुरू केल्याने तांबेपुरा परिसरातील नागरिकांनी सभापती कैलास पाटील यांचे जाहीर आभार मानत, “काम असावे तर असे!” अशा शब्दांत त्यांचे भरभरून कौतुक केले आहे.

​यांच्या संयुक्त प्रयत्नातून मोहिमेला यश:

​माजी आमदार शिरिषदादा चौधरी यांचे मार्गदर्शन:
शहराचा कायापालट करण्यासाठी आणि नागरिकांना मूलभूत सुविधा दर्जेदार देण्यासाठी माजी आमदार दादासो. शिरिषदादा चौधरी यांचे मार्गदर्शन नेहमीच दिशादर्शक ठरले आहे. त्यांच्याच भक्कम पाठबळामुळे आणि दूरदृष्टीमुळे या मोठ्या मोहिमेला खऱ्या अर्थाने गती मिळाली आहे.

​नगराध्यक्ष डॉ. परिक्षित बाविस्कर यांचा ‘आरोग्य प्रथम’ अजेंडा:
“नागरिकांच्या आरोग्याशी अजिबात तडजोड नाही,” ही ठाम भूमिका घेत लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परिक्षित बाविस्कर यांनी या साफसफाई मोहिमेला तातडीने मंजुरी दिली. त्यांच्या विकासवादी भूमिकेमुळेच प्रशासकीय चक्र वेगाने फिरली.

​मुख्याधिकारी गणेश शिंदे यांचे ‘ॲक्शन मोड’ मधील नियोजन:

एकही दिवस शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत न होऊ देता, अत्यंत वेगात आणि दर्जेदार पद्धतीने काम कसे पूर्ण करावे, याचे चोख नियोजन मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी केले आहे. प्रत्यक्ष कामावर बारीक लक्ष ठेवून त्यांनी प्रशासकीय कसब दाखवून दिले आहे.

​थोडक्यात पण महत्त्वाचे:
नगरपालिकेच्या या धडक आणि नियोजनबद्ध मोहिमेमुळे आता अमळनेरकरांना पूर्णपणे जंतूमुक्त, स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळणार हे आता निश्चित झाले असून नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!