अमळनेर : रक्षा बंधन म्हणजे रक्षण करण्यासाठी बांधलेला वचनाचा ,हमीचा प्रेमाचा धागा. अमळनेर येथील नगराध्यक्ष डॉ परीक्षित बाविस्कर यांची कन्या कु अरुश्री हिने देशाच्या नागरिकांचे आणि बालकांचे रक्षण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी पाठवली आणि नरेंद्र मोदी यांनी देखील चिमुकलीच्या राखीला पत्राने उत्तर देत सुरक्षित ,सुखी जीवनाची हमी देत तिचे कौतुक केले आहे.

शुद्ध बीजा पोटी फळ रसाळ गोमटी,सामाजिक बांधिलकी जोपासत निरपेक्ष भावनेने अव्याहतपणे *वैद्यकीय क्षेत्रात सेवारत असलेले लोकनियुक्त नगराध्यक्ष प्रतिथयश हृदय रोग* तज्ञ डॉ.परिक्षीत श्रीराम बाविस्कर व डॉ.सौ.स्वाती परीक्षित बाविस्कर यांची कन्या रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल मधील इयत्ता सहावी ची विद्यार्थिनी कु.अरुश्री परिक्षीत बाविस्कर* या
विद्यार्थिनीने राष्ट्रनेते, लाडके प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांना जनसेवा,राष्ट्र कल्याणार्थ उदंड, निरामय आयुष्य चांगले आरोग्य मिळो या करिता पवित्र सण रक्षा बंधनाच्या पावन पर्वावर रक्षा सूत्र (राखी, शुभपत्र)पाठवले होते , कु. अरुश्री हिचे पत्र व राखी नवी दिल्ली येथील प्रधानमंत्री कार्यालयाला प्राप्त झाल्याने नुकतेच राष्ट्रनेते लाडके प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विशेष पत्र पाठवून कौतुक करत आभार मानले तसेच
