अमळनेर : भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त अमळनेर शहरात उत्साहाचे वातावरण होते. सकाळी ८ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ बुद्ध वंदना घेऊन महामानवास विनम्र अभिवादन करण्यात आले.

मान्यवरांची उपस्थिती
याप्रसंगी आमदार अनिल पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, प्रांताधिकारी मयूर भंगाळे, मुख्याधिकारी गणेश शिंदे, तहसीलदार रुपेश कुमार सुराणा, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांसह आरोग्य अधिकारी जाधव, खंडारे, माणिक आणि अग्निशमन अधिकारी गोसावी यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
विविध क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी
अभिवादन सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. यात माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, माजी नगरसेवक नरेंद्र संदानशिव, कैलास पाटील, महेश देशमुख, नावेद शेख, दीपक चौगुले, नगरसेविका सविता संदानशिव,नंदाताई संदानाशिव , शोभा गढरे, देवेंद्र कांबळे, प्रवीण जैन, रणजित शिंदे, प्रा. अशोक पवार यांच्यासह संविधान जागर अभियानाच्या कार्यकर्त्या श्रद्धा रेखा राजेंद्र, अनिता संदानशिव, भारती कोळी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या मंगला सोनवणे, समता सैनिक दलाचे सुनील करंदीकर, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मेजर विनोद बिऱ्हाडे, वरिष्ठ पत्रकार विजय संदानशीव व असंख्य महिला , वृद्ध बालकां सह सर्व समाजातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
जयंतीनिमित्त युवा कल्याण प्रतिष्ठान आणि संविधान जागर अभियान यांच्या वतीने ‘चवदार तळे’ ही नाटिका सादर करण्यात आली. या नाटकाने उपस्थितांचे डोळे दिपवून टाकले. तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेच्या वतीने आयोजित विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त
मिरवणुकीसह दिवसभरातील सर्व सांस्कृतिक कार्यक्रम शांततेत पार पडले. पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवल्याबद्दल समाज बांधवांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करत हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला.
