अमळनेर : तालुक्यातील शेतकरी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला गती देण्यासाठी आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजना’ आणि ‘पाणीटंचाई निवारण’ या विषयावर महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत प्रशासकीय कामांचा डोंगर उपसण्यापेक्षा प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर देत, आमदारांनी अधिकाऱ्यांना कडक निर्देश दिले आहेत.

