🪔🏮🪔🏮🪔🏮🪔🏮🪔🏮🪔🏮
करडी नजर च्या सुज्ञ वाचकांना दीप उत्सवाच्या शुभेच्छा
ज्यांनी ज्यांनी लवंगी फटाक्याचा सर सोडवून एक एक फटाका वाजवला त्या सर्व भाग्यवंताना दिवाळीच्या शुभेच्छा!!

ज्यांनी ज्यांनी मोती साबणाचे शेवटचे तुकडे संपेपर्यंत तो साबण वापरला त्या काटकसरी लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा!!
ज्यांनी ज्यांनी गल्लीतील फुसके फटाके गोळा करून त्यातील दारु काढून मोठा धमाका केला त्या धाडसी लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा!!
ज्यांनी ज्यांनी सांडशीचा वापर करून टीकल्या दुसऱ्याच्या पायाजवळ फोडल्या त्या करामती लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा!!
ज्यांनी ज्यांनी फराळाचे पदार्थ जसे लाडू चकल्या चड्डीच्या खिशात घालून गुपचूपपणे खाल्ले अशा खवय्याना दिवाळीच्या शुभेच्छा!!
🪔🏮🪔🏮🪔🏮🪔🏮🪔🏮🪔🏮
डॉ विजय गाढे
मुख्यसंपादक, करडी नजर न्यूज
