अमळनेर येथील ग्राम विकास शिक्षण मंडळाचे कै.न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची 396 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत देसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून , पुष्पहार अर्पण करून मानाचा मुजरा केला. याप्रसंगी प्रा.डॉ. दिलीप कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले, ज्यांच्या शौर्याने इतिहास घडला ज्यांच्या नेतृत्वाने स्वराज्य उभे राहिलं. असे रयतेच्या राजाला सर्वांनी त्रिवार मानाचा मुजरा केला.
यावेळी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर वृंद उपस्थित होते, तसेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.
