अमळनेर येथील कानिष्कां फाउंडेशन संचालित सी . आर . पाटील इंटरनॅशनल स्कूल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली तसेच लेझीम व पारंपरिक नृत्याचे सुंदर सादरीकरण केले. भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचे शौर्य, दूरदृष्टी, नेतृत्वगुण आणि स्वराज्य स्थापनेतील योगदान यावर प्रभावी भाषणे केली.
उज्ज्वल फॉउंडेशन यांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली. ही स्पर्धा सौ. भारती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जीवनावरील चित्रांना आकर्षक रंग भरून आपली कला सादर केली. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.
संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नूतन महेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
अनेक विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज व इतर ऐतिहासिक व्यक्तिरेखांचे वेश परिधान केले होते. संपूर्ण शाळा भगव्या पताकांनी व आकर्षक रांगोळ्यांनी सजवण्यात आली होती.
राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, शिस्त आणि नेतृत्वगुणांची प्रेरणा निर्माण झाली.
अमळनेर- तालुक्यातील निम येथील श्रीक्षेत्र कपिलेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्री निमित्ताने खान्देशासह राज्यभरातील भाविकांनी हजेरी लावीत दर्शन घेतले. दर्शनासाठी भाविकांनी…
अमळनेर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या जयंती निमित्त मान वदंना देण्यासाठी उसळला महासागर. संविधान निर्माते, विश्वरत्न, करुनेचा सागर, महामानव डॉ…