अमळनेर येथील पांजरा नदी सह तापी नदीवर वाळू माफी्यांनीं बिनधास्त नंगा नाच चालवला आहे. हा नंगा नाच महसूल च्या सहकार्याने की नाकावर टिचून केला जात आहे, असा प्रश्न सुज्ञ नागरिक करीत आहे.

ऐन दिवाळीच्या सणा सुदीच्या कालावधीत महसूल विभागाला सुट्टी असल्याने वाळू माफी्यांनी तालुक्यातील पांजरा, तापी तथा बोहरी नदीत वाळू चोरीचा हैदोस घातला आहे. लाखो करोडो रुपयाचा महसूल बुडवीला जात आहे. महसूल प्रशासनाकडून केला जात असलेला कानाडोळा भूमिकेवर तीव्र संशय सुज्ञ नागरिक करीत आहे.कारण शहरात रांत्र दिवस बिना नंबर व पावतीचे डंपर सहजपणे वाळू वाहतूक करतांना दिसत आहे.
महसूल विभाग नाममात्र छोट्या छोट्या गाडयांवर कारवाई करते.यात अर्थ पूर्ण दृष्टिकोन असल्याची चर्चा होतांना दिसते.
