अमळनेर: “आपल्या मुला-मुलींना केवळ नाजूक बनवण्यापेक्षा, कोणत्याही संकटाचा सामना करणारा गर्जणारा छावा बनवा,” हाच उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून अमळनेर शहरात प्रथमच ‘बी. बॉईज बॉक्सिंग अकॅडमी’ (B. BOYS Boxing Academy) च्या माध्यमातून बॉक्सिंग प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे. या अकॅडमीमुळे अमळनेरमधील तरुण पिढीला आणि विशेषतः मुलींना स्व-संरक्षणाचे (Self Defense) उत्तम बळ मिळणार आहे.

