अमळनेर येथे दि. 24 जानेवारी रोजी वंचीत बहुजन आघाडीची आढावा बैठक जिल्हा अध्यक्ष ईश्वर पाटील (लाला सर ) यांच्या उपस्थितीत शहरातील प्रबुद्ध विहार येथे घेण्यात आली.
सदर बैठकीला जिल्हा अध्यक्ष ईश्वर पाटील (लाला सर )यांनी प्रमुख मार्गदर्शन करतांना सांगितले की येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत फुले, शाहू,आंबेडकरी सम विचांराच्या पक्षा सोबत युती करू अन्यथा स्वबळावर लढवू. महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन सम्राट बाळासाहेब आंबेडकर यांनी नगरपालिका व महानगर पालिकेत चांगले यश मिळावले आहे आता जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत आपले उमेदवार कसे निवडून येतील यासाठी गावापातळीवर संपर्क अभियान राबविले पाहिजे असे सांगून नवं नियुक्त तालुका अध्यक्ष दाजीबा गव्हाणे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.जिल्हा उपाध्यक्ष हरिचन्द्र सोनवणे साहेब यांनी पक्ष बांधणी व गाव तेथे शाखा उभारणीचे सूत्र दिले.जिल्हा युवा अध्यक्ष जितुभाऊ केदार यांनी पक्षात युवकांनी जास्त शामिल व्हावे असे आव्हान केले.
जिल्हा महासचिव प्रा. प्रीतीलाल पवार यांनी मार्गदर्शनात संघटनात्मक बांधणी करण्यासाठी प्रयत्न करावा आणि पक्षाचे ध्येय धोरण तळागाळातील लोकांपर्यंत पहोचवावे असे सुचवले.
जिल्हा महानगर उपाध्यक्ष विकासभाऊ भालेराव यांनी ही मनोगत व्यक्त केले तर सूत्र संचालन व आभार तालुका अध्यक्ष दाजीबा गव्हाणे यांनी व्यक्त केल.
अमळनेर : भारतीय लष्कराच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी आणि राष्ट्रप्रेम जगविण्यासाठी शिवसेना तसेच समस्त राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या वतीने २१ रोजी शहरात काढण्यात…
अमळनेर प्रतिनिधी , राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा अमळनेर मतदारसंघाचे भूमिपुत्र आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते शहरातील विविध प्रभागात विकासकामांच्या भूमीपूजनाचा…