अमळनेर येथील नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित शैक्षणिक संकुलात भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन बाजार समिती संचालिका सौ सुषमा वासुदेव देसले यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उल्हास वर्धक वातावारणात पार पडला.
सविस्तर वृत्त की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक कष्ट करून जगातील सर्वात मोठे संविधान देशाला अर्पित केले. देशाने 26 जानेवारी 1950 ला संविधानाचा स्वीकार करून खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या नव्या पर्वाची सुरुवात करून सर्वसामान्य जनतेला संविधानाचे अधिकार बहाल केले.तो दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन होय.संविधानाच्या माध्यमातून समता, स्वातंत्र्यता, बंधुता व न्याय हक्क नागरिकांना बहाल केले.

जगातील मोठ्या लोकशाहीचा उत्सव नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित शैक्षणिक संकूलात शिक्षण शास्त्र महाविद्यालय, विजय नाना पाटील आर्मी स्कुल, आयटीआय व कृषी महाविद्यालय आदींनी भव्य पटांगनात प्रजासत्ताक दिन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका तथा लोकनियुक्त आदर्श सरपंच्या सौ सुषमा वासुदेव देसले यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहन करून केला.यावेळी सैनिकी शाळेतील मुलांनीं अतिशय सुंदर कवायत करत त्यांना मानवंदना दिली.

याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका सौ सुषमा देसले यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, माजी केंद्रीय मंत्री तथा आपल्या सर्वांचे आदरणीय शिक्षण महर्षी नानासाहेब विजय नवल पाटील यांनी अमळनेर मध्ये तळागळातील मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिले त्याबद्दल त्यांचे प्रथम आभार मानते कारण राष्ट्र उन्नतीच्या कार्यात त्यांनी व त्यांचे जन्मदाते स्वातंत्र्य सैनिक नवलभाऊ पाटील यांनी मोलाचे कार्य केले आहे .प्रजासात्तक दिवस हा एक राष्ट्रीय सण आहे.विद्यार्थ्यांनी या दिवशी स्वातंत्र्य सैनिक,पोलीस व क्रांतिवीरांचे स्मरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिवीर देशभक्तांनी, स्वातंत्र्यवीरांनी, राष्ट्रभक्तांनी कर्म केले, निष्काम कर्मयोग साधला व वेळप्रसंगी बलिदान दिले. या सर्व गोष्टींचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करून राष्ट्राचा सुसंस्कृत वारसा जपावा असे मत व्यक्त केले. जीवन जगत असताना मानधना साठी नजगता देशासाठी जगावे, पोलीस अथवा सैनिक देशासाठी जगतात,त्यामुळे आपण सुरक्षित.पुस्तकी ज्ञाना पेक्षा आपण देशाच्या किती कामाला आलो हें महत्वाचे. माझे पती वासुदेव देसले,उपविभाग पोलीस अधिकारी यांनी कोविड काळात दोन वर्ष मुलं अलिप्त ठेवून मालेगाव कराना सुरक्षित ठेवले.आमचा परिवार राहत असलेल्या परिसराला न्याय देण्यासाठी सामाजिक कार्यात उतरलो आहोत. देश हित जपण्याचा मानस प्रत्येकाने मनाशी बाळगला पाहिजे.
-: विशेष सन्मान :-
राष्ट्रभाषा हिंदी निबंध स्पर्धेत सहावीचा विशाल चौधरी याने विशेष यश संपदान केल्याने मेडल देऊन सन्मान,टीईटी परीक्षा उत्तीर्ण केलेले एस बी पवार, शरद पाटील,सुभेदार श्रीराम पाटील,नायब पाटील,सुभेदार अनिल पाटील, हवालदार डी डी पाटील,शिक्षक एकनाथ पाटील, प्रा उषा पाटील आदींचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
-: सांस्कृतिक कार्यक्रम :-

