अमळनेर शहरातील सर्व नागरिकांना या पाणीपुरवठा विभागा च्या सूचनेद्वारे कळविण्यात येते की,
जळोद ते गांधली दरम्यानची मुख्य रॉ-वॉटर पाईपलाईन फुटल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.रात्रीपासून कर्मचाऱ्यांकडून गळतीचे ठिकाण शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.या तांत्रिक बिघाडामुळे जलशुद्धीकरण केंद्राकडे होणारा पाणी उपसा सध्या ‘सिंगल पंपिंग’ ने सुरू आहे.
अंबऋषी टेकडी येथील जलशुद्धीकरण केंद्रातील MBR ची पातळी (Level) १.५ पर्यंत खाली आल्यामुळे, साठा वाढवण्यासाठी आज पहाटे ३:०० वाजेपासून पाणीपुरवठा तात्पुरता थांबवण्यात आला आहे.
अमळनेर शहरातील विविध भागांचा पाणीपुरवठा नियोजित वेळेपेक्षा उशिरा (Late) होईल किंवा काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.
मुख्य पाईपलाईनची दुरुस्ती आणि MBR ची पातळी पूर्ववत करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. तरी नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरावे आणि अमळनेर नगरपरिषद यांना सहकार्य करावे,असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे सभापतीश्री कैलास नामदेव पाटील यांनी केले आहे.