एसटी च्या आजी-माजी कर्मचाऱ्यांना प्रवास साठी मिळणार मोफत पास..

अमळनेर: एसटी महामंडळाने त्यांच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांना विशेष भेट दिली आहे. त्यानुसार सेवेतील कर्मचायांच्या कुटंबीयांना २ महिन्याऐवजी ४ महिने, तर माजी कर्मचा्यांना पूर्वीच्या सहा महिन्याऐवजी नऊ महिने एसटी प्रवासाचा पास मोफत मिळणार आहे.ही सवलत सध्या बस साठीच असल्याने कर्मचा्यांमध्ये मात्र नाराजी आहे.


चांद्यापासून बांध्यापर्यंत सर्वसामान्य नागरिकांच्या सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचे प्रमुख साधन म्हणून एसटीच्या प्रवासी वाहतुकीकड़े बघीतले जाते. एसटी महामंइळात सध्या सुमारे ८६ हज़ार अधिकारी- कर्मचारी कार्यरत आहेत. पती वा पत्नी , दोन मुले,आई- वड़ील, विधवा बहिणीला महामंडळाकडून प्रत्येक वर्षी दोनदा,प्रत्येकी एक महिन्याची मोफत प्रवास पास मिळत होती.परंतु कामगार संघटनांनी वर्षभर ही सवलत देण्याची मागणी केली. त्यासाठी बऱ्याचदा आंदोलनही केले.

दरम्यान राज्यपरिवहन संचालक मंडळाच्या १८ डिसेंबर २०२४ रोजीच्या बैठकीत कामागार करार
२০০७-२০০८ मधील तरतुदीनुसार सेवेतील कर्मचारयांना जानेवारी ते जून या पहिल्या सत्रात दोन महिने तर जुलै ते डिसेंबर या दुसऱ्या सत्रात दोन महिने अशी चार महिने मोफत प्रवास पास देण्यास मंजुरी देण्यात आली.त्याबाबतचा आदेश ४ फेब्रुवारी २०२५ रोजी निघाला.

एसटीतील सेवानिवृत कर्मचाऱ्यांच्या पती वा पत्नीला वर्षातून विशिष्ट कालावधी साठी पूर्वी सहा महिनेच मोफत पास मिळत होती.परंतु आता ही पास नऊ महिन्यांसाठी मिळणार आहे.

राज्यात नुकतीच शिवाई ही ई- बससेवा सुरू झाली आहे. परंतु या बसमध्ये पासधारकाला मोफत प्रवासाची मुभा नाही. शिवशाहीने जायचे असेल तर साधी बस आणि शिवशाही बसमधील प्रवास भाडयातील तफावतीची रक्कम भरून प्रवास करता येतो. शिवाशाही बसमध्ये मात्र या पद्धतीनेही प्रवासाची मुभा नाही.सेवेवरील कर्मचायांना ४ महिने तर सेवानिवृत कर्मचायांना ५ महिन्यांचीच पास मिळ्णार आहे.ही सवलत फत्त साध्या बससाठीच देणे चुकीचेआहे. वर्षभर कोणत्याही एसटी बसमध्ये प्रवासाची मुभा द्यायला हवी,असे मत महाराष्ट्र एसटी कामगार संघठनेच्या पदाधिकारयांनी व्यक्त केले.

एसटी महामडळाकड़े किती बसेस?

एसटी महामंडळा कडे सध्या १४ हजार ४o০ बसेस आहेत.काही वर्षापूर्वी या बसेसची संख्या सतरा हजाराहून अधिक होती.त्यामुळे करोना नतर आर्थिक अडचणीत सापड़लेल्या एसटीच्या ताफ्यात बसेस मोठ्या संख्येने कमी झालेत्या दिसत आहे.या बसेस वाढवण्यासाठी आता प्रयत्न सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!