कर वसुलीत अडथळा आणणाऱ्या वर गुन्हे दाखल करा – मुख्याधिकारी वेवो तोलू केझो यांचे आदेश…

अमळनेर येथील प्रशिक्षणार्थी भाप्रसे तथा अमळनेर मुख्याधिकारी वेवो तोलू केझो यांनी घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकी मोठया प्रमाणावर असल्याने तात्काळ जप्तीची कारवाई करावी असे आदेश दिले.

सविस्तर वृत्त असे की, प्रशिक्षण कालावधीन भाप्रसे अधिकारी तथा मुख्याधिकारी वेवो तोलू केझो यांनी पालिकेतील सर्व विभागाना भेट देऊन विभागवार आढावा घेतले असता शहरातील कर थकबाकी मोठ्या प्रमाणावर असल्याने वसुली साठी कड़क मोहीम सुरू करण्याचे आदेश त्यांनी सदर विभागातील कर्मचाऱ्यांना दिले. याकरिता प्रभागनिहाय पथके तयार करून थकबाकी जमा करत असतील तर वसूल करा अन्यथा जप्तीची मोहीम सुरू करा. तसेच जर कुणी वसुलीस अडथळा आणेल तर पोलिसांत गुन्हा नोंदवा,असे आदेश त्यांनी कर्मचाऱ्यांना दिले.

मुख्याधिकारी वेवो तोलू केझो यांनी शहरातील स्वछता अभियान राबविण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे.यामुळे पालिका प्रशासन अलर्ट मोडवर आले असून मंगळवारी पदभार घेतला असून बुधवारी
सफाई कामगारांची हजेरी घेतली.सकाळीच धुळे रस्ता
साफसफाई मोहीम त्यांच्या निगराणी खाली राबविण्यात आली.सर्व अधिकारी सफाई मुकादम सफाई कामगार पहाटेच हजर होते. त्यामुळे सर्व प्रशासन कर्मचारी अलर्ट मोडवर आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!