अमळनेर ,नुकत्याच झालेल्या विधानसभेच्यां निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले.आता प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वेध कार्यकर्ते व इच्छुकांना लागले आहेत. न्यायालयीन प्रक्रियात इतर अड़चणी दूर होऊन लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचा बिगूल वाजेल, असे राजकीय तज्ज़ांचे मत आहे. त्यामुळे मनपा, जिल्हा परिषद निवडणूकीसाठी इच्छुक तयारीला लागले आहेत.

प्रभागरचना,राज्यातील सत्ताबदल आणि मराठा,ओबीसी आरक्षण आदी कारणांमुळे गेल्या अडीच ते तीन वर्षापासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्या आहेत. नुकतीच विधानसभा निवडणुक पार पडली. महायुतीला घवघवीत यश मिळाल्याने राज्यातील सत्तास्थापनेला अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तातड़ीने घेतल्या जातील अशी चर्चा आहे.
विधानसभेची निवडणूक सुरु असताना स्थानिक स्वराज्य संस्थेत जाण्यासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांनी विधानसभेत रंगीत तालीम केली.साहेबांचा पैसा आणि आपलीच ओळख निर्माण करत मतदारांशी संपर्क साधला. ग्रामीण भागात लोकसभा, विधानसभा निवडणुक प्रचाराच्या निमित्ताने अनेक इचछुकानी गण, गट सह प्रभागातील घर न घर पिंजून काढले.विधानसभा निवडणुकीत तर अनेक माजी नगरसेवकांसह इच्छुकानी मोठे शक्तिप्रदर्शन केले.आपल्याच निवडणूकीची रंगीत तालीम करून घेतली.
राज्यात महायुतीला बहूमत मिळाले असल्याने सध्या सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. सरकार स्थापन झाल्या नतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीचा मार्ग मोकळा होणार असल्याचे संकेत राजकीय तज्ञ देत आहेत. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून गुडध्याला बाशिंग बांधून बसलेले कार्यकर्त्या मध्ये उत्साह निर्माण झाला आहे. आतापासून स्थानिक नेत्याच्या टच मध्ये राहत असून साहेब..आमच्या तिकिटाच तेवढ़ बघा..अशीगळ घालत असल्याचे दिसून येत आहे.
अमळनेर मनपात गेल्या तीन वर्षापासून प्रशासक राज आहे. मुदत संपलेले जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य तसेच नगरसेवक व नव्याने इचछुक असलेले पदाधिकारी,कार्यकर्त कधी एकदाची निवडणूक जाहीर होते, याची वाट पाहत आहेत.
मात्र विधानसभेत ज्या पद्धतीने आपल्या साहेबांचे मतदारांना लक्ष्मी दर्शन घडवून आणण्यात हिररिने सहभाग नोंदवला होता.हे करत असताना मतदारांच्या वाढलेल्या अपेक्षा पाहता अनेक इच्छुकांनी धास्ती घेतल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्यांनी आपली कुवत पाहूनच हिम्मत करावी, अशी चर्चा बघायला मिळते.यामुळे मात्र प्रामाणिक व इमानदार गरीब व्यक्ती सत्तेत समाविष्ट होऊ शकतो,ही शक्यता नाही.लोकशाहीची वाटचाल भांडवलदार तथा श्रीमंताच्या हातात जाऊन भविष्यात हुकूमशाही कडे होणार असल्याचे समाजातील तज्ञ लोक मत व्यक्त करीत आहे. लक्ष्मीच्या जोरावर मतविकत घेऊन विकासकामे नकरता जनतेला बेरोजगारी,गुंडगिरी व सामाजिक अशांततेच्या खाईत लोटल्या शिवाय राहणार नाही हे मात्र तितकेच खरे वाटते.हे सर्व मशीन मध्ये गडबड करून सत्तेत येणे शक्य असल्याचे विरोधक उघड पणे बोलताना दिसत आहे.एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊनच दाखवा असा हेका जोरधरत आहे.या सगळ्या गोंधळात जनता मात्र मूग गिळून बसणार की रस्त्यावर उतरून आंदोलन करेल,हे येणारा काळच ठरवेल.सध्या तरी अनेक कार्यकर्ते गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज झाले आहे.
