अमळनेरचे सुप्रसिद्ध सर्जन डॉ. अनिल शिंदे यांना ‘पुढारी आरोग्य रत्न २०२६’ पुरस्कार प्रदान

   अमळनेर: वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय सेवा व सामाजिक बांधिलकीची दखल घेत अमळनेर येथील नामवंत सर्जन डॉ. अनिल शिंदे यांना ‘पुढारी आरोग्य रत्न २०२६’ या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिक येथे पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते त्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

   गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांचे कौशल्य: डॉ. शिंदे यांनी अनेक वर्षांपासून शेकडो क्रिटिकल शस्त्रक्रिया यशस्वी करून गंभीर रुग्णांना नवजीवन दिले आहे.

   अमळनेरचे एकमेव डॉक्टर: उत्तर महाराष्ट्रातील निवडक ३६ डॉक्टरांमध्ये अमळनेर तालुक्यातून पुरस्कार पटकावणारे डॉ. शिंदे हे एकमेव डॉक्टर ठरले.

  मान्यवरांची उपस्थिती: या सोहळ्यास विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, शिवसेना उपनेते अजय बोरस्ते व संपादक राहुल रनाळकर उपस्थित होते.

   वैद्यकीय सेवेला रुग्णसेवेचा वसा मानणाऱ्या डॉ. शिंदे यांच्या या सन्मानामुळे अमळनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून संपूर्ण परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!