माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते कन्या शाळेत समाज घडविणाऱ्या ‘ज्ञानदात्रीं’चा गौरव; मान्यवरांनी व्यक्त केल्या शुभेच्छा.”

 

अमळनेर शहर प्रतिनिधी,जागतिक महिला दिनानिमित्त आज अमळनेर येथील डी. आर. कन्या शाळेत विशेष कार्यक्रम आयोजित करून महिला शिक्षिकांचा सन्मान करण्यात आला. समाजात ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या आणि विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाऱ्या या ‘ज्ञानदात्री’ंच्या कार्याला मानाचा मुजरा देत मान्यवरांनी त्यांचा गौरव केला.

या प्रसंगी अमळनेर शहराचे प्रथम नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शाळेला सदिच्छा भेट देत महिला शिक्षिकांना शुभेच्छा दिल्या. शिक्षणाच्या माध्यमातून समाज घडविण्यात महिला शिक्षिकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

माजी आमदार मा. शिरीषदादा चौधरी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यात महिला शिक्षिकांचा वाटा सिंहाचा आहे. त्यांच्या कष्टामुळेच सुसंस्कृत आणि सक्षम समाजाची निर्मिती होत आहे.”

यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परिक्षित बाविस्कर, शिक्षण सभापती नाविद शेख, नगरसेवक अनिल महाजन आणि नगरसेवक गौरव चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते डी. आर. कन्या शाळेतील सर्व महिला शिक्षिकांचा सत्कार करण्यात आला.

या सन्मानामुळे शिक्षिकांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. समाजात महिलांच्या योगदानाचा गौरव करणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!