जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी जी.एस. हायस्कूलचा विजयी संघ रवाना!

    अमळनेर  — खान्देश शिक्षण मंडळ संचलित जी.एस. हायस्कूल, अमळनेरच्या १७ वर्षांखालील गटातील विजयी खो-खो संघाची दि. १६ ऑक्टोबर रोजी व.वा. वाचनालय, जळगाव येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कर्णधार दुर्गेश सोनवणे याच्यासह कुणाल पवार, यश मिस्त्री, अनंत संदानशिव, लक्षराज पाटील, नाविण्य धनगर, वैभव गुरव, तेजस पाटील, मयूर पाटील आणि चेतन पाटील हे खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

     या संघाला शालेय समितीचे चेअरमन अण्णासाहेब श्रीहरी भिका वाणी, मुख्याध्यापक व्ही. एम. पाटील, उपमुख्याध्यापक सी. एस. सोनजे, के. पी. पाटील, क्रीडा विभागप्रमुख के. आर. बाविस्कर, शिक्षक प्रतिनिधी आर. जे. पाटील व पी. एस. काटकर तसेच संघाचे मार्गदर्शक जे. व्ही. बाविस्कर आणि के. डी. साळुंखे यांनी शुभेच्छा देत जिल्हास्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!