अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयातील करियर कौन्सिल सेंटर मध्ये प्रताप कॉलेज व कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त स्कॉलर प्रताप्रियन्स निवडीसाठी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा,पीपीटी सादरीकरण, गटचर्चा, मुलाखत या विविध टप्प्याद्वारे पाच विद्यार्थ्यांची अंतिम निवड केली जाणार आहे. ही निवड प्रक्रिया पारदर्शक असून गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असणार आहे.

वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त करियर कौन्सिलिंग सेंटर प्रत्येक वर्षी बेस्ट स्कॉलर प्रताप्रियन्स यांची निवड करीत असते यासाठी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोग व संघ लोकसेवा आयोगाच्या धरतीवर विविध स्वरूपाच्या टप्प्यातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व विकास चाचणी व कौशल्य तपासले जाते. त्याद्वारे विद्यार्थ्यांची निवड परीक्षकांच्या माध्यमातून केली जाते.
★★★ परीक्षेचे वेळा पत्रक ★★★
दिनांक ०१ जानेवारी २०२५ रोजी या निवडीचा पहिला भाग म्हणजे पूर्व परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची 100 गुणांची सकाळी ११:३० ते ०१ पर्यंत सीसीएमसी विभागात व ऑडिओ,व्हिडिओ हॉल या ठिकाणी घेण्यात आली. यावेळी २४६ विद्यार्थ्यांनी MPSC च्या धरतीवर असणारी ही परीक्षा दिली. त्यांची मुख्य परीक्षा ही ०४ जानेवारी २०२४ रोजी घेण्यात येणार आहे. ०६ जानेवारी रोजी ज्वलंत विषयावर गटचर्चा व पीपीटीचे सादरीकरण होणार आहे, त्यानंतर ०७ तारखेला टॉप १५ गुणवंत विद्यार्थी असतील, त्यांची मुलाखत प्रक्रिया होणार आहे.एकूण 15 गुणवंत विद्यार्थ्यातून शेवटी गुणांनूकर्मे पाच विद्यार्थ्यांची अंतिम निवड केली जाणार आहे ,त्यांना स्नेहसंमेलनाच्या समारोप प्रसंगी प्रमुख अतिथीद्वारे सन्मानित करण्यात येणार आहे.
आज झालेल्या पूर्व परीक्षेच्या नियोजनासाठी स्पर्धा संजोजक डॉ.जितेंद्र पाटील सह अनेक प्राध्यापक वृंदानी सहभाग घेतला तर प्रस्तुत स्पर्धेसाठी प्राचार्य डॉ.ए.बी जैन,डॉ.धीरज वैष्णव,डॉ.अमित पाटील,डॉ.मुकेश भोळे आदींनी मार्गदर्शन केले.
यावेळी करिअर कौन्सिलिंग सेंटरचे प्रमुख डॉ. विजय तुंटे उपस्थित होते
