डी. आर. कन्या शाळेत वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा; विद्यार्थिनींनी घेतली नियमित वाचनाची शपथ

     अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित डी. आर. कन्या शाळेमध्ये सकाळ व दुपार अशा दोन्ही सत्रांत ‘वाचन प्रेरणा दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे वाचन करून नियमित वाचन करण्याचा संकल्प केला व तशी शपथ घेतली.

      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सुर्यवंशी तर प्रमुख उपस्थिती उपमुख्याध्यापक श्री. एस. आर. शिंगणे यांची होती. मंचावर पर्यवेक्षक श्री. एस. पी. वाघ, शिक्षक प्रतिनिधी सौ. पी. पी. जोशी, श्रीमती आर. एस. सोनवणे, श्रीमती एस. एस. देवरे, श्री. एस. एस. माळी, ज्येष्ठ लिपिक श्री. शाम पवार तसेच सकाळ विभागाच्या प्रमुख वक्त्या श्रीमती एम. एम. पाटील व दुपार विभागाचे प्रमुख वक्ते श्री. के. पी. सनेर उपस्थित होते.

      कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी डॉ. कलाम यांच्या जीवनकार्याचा गौरव करत त्यांच्या प्रेरणादायी आठवणींना उजाळा दिला. प्रमुख वक्त्यांनी डॉ. कलाम यांच्या मिसाईल निर्मितीतील योगदानावर आणि भारताच्या वैज्ञानिक प्रगतीवर सविस्तर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रमपूर्वक सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!