नाशिक प्रतिनिधी,भाजपाचे तरुण तडफदार व कर्तुत्वान असलेली व्यक्ती डॉक्टर श्री कपिल पाटील यांनी भाजपा मध्ये सदस्य पासून तालुका जिल्हा पातळी वर काम करून भाजपा वाढवण्यासाठी त्यांनी संघटन केले तसेच भाजपाचे महत्त्व त्यांनी पटवून दिले कमी वयात भाजपात त्यांनी निष्ठावंत म्हणून राहु न कामे केली पद असो का नसो त्यांनी भाजपासाठी काम करून निष्ठावंतांची एक फळी तयार केली त्याचे त्यांना भाजपातर्फे वरिष्ठांनी त्यांची दखल घेऊन त्यांना अनेक पद दिले त्या पदामार्फत त्यांनी अनेकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला त्यांच्या या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब तसेच भाजपा वैद्यकीय आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री डॉक्टर अजित गोपछडे महाराष्ट्र वैद्यकीय आघाडी प्रदेश संयोजक डॉक्टर श्री बाळासाहेब हरपळे यांच्या संमतीने डॉक्टर श्री कपिल पाटील यांची भाजपा वैद्यकीय विद्यार्थी आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र विभागाच्या समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली.

त्यांच्या या नियुक्तीचे भारतीय जनता पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र विभागाच्या डॉक्टर असोसिएशन तर्फे अभिनंदन करण्यात आले.
