अमळनेर ,24 डिसेंबर 2024 रोजी श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथे राष्ट्रीय गणित दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने महाविद्यालयाच्या गणित विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
23 डिसेंबर 2024:या दिवसात Mathematics Quiz घेण्यात आली, ज्यामध्ये 170 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. याशिवाय, PPT Presentation स्पर्धेत 15 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपापले कौशल्य सादर केले.
24 डिसेंबर 2024:या दिवशी डॉ. एम.डी. सूर्यवंशी (गणित विभाग प्रमुख, SSVPS College, धुळे) यांचे “Importance of Mathematics” या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी IKD Classes चे संचालक श्री किरण माळी सर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. ए.बी. जैन यांनी भूषवले. तसेच IQAC कॉर्डिनेटर प्रा. डॉ.मुकेश भोळे , डॉ. नलिनी पाटील मॅडम, डॉ. वंदना भामरे, प्राध्यापक रोहन गायकवाड आणि इतर मान्यवरही उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वंदना भामरे यांनी कुशलतेने केले, तर प्रास्ताविक गणित विभाग प्रमुख प्रा. डॉ. नलिनी पाटील यांनी केले.
बक्षीस वितरण:
कार्यक्रमाच्या शेवटी Mathematics Quiz व PPT Presentation स्पर्धेत पहिल्या तीन विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच प्रश्नमंजुषा कॉम्पिटिशनमध्ये सहा विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. या बक्षीसांचे प्रायोजन ॲल्युमिनियम असोसिएशन आणि IKD Mathematics Classes चे संचालक श्री किरण माळी सर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गणित विभागातील प्राध्यापक रोहन गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांना प्रा. वंदना भामरे, प्रा. प्रियंका पाटील, प्रा. प्रेरणा सोनवणे, प्रा. निकिता पाटील तसेच इरफान कुरेशी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सदर कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयीची आवड आणि महत्त्व यांची जाणीव निर्माण करण्यात यश आले.
