अमळनेर: येथील धनदाई महाविद्यालयाचा रेड रिबन क्लब व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एड्स जनजागृती उपक्रम संपन्न झाला. याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून अमळनेर ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक अश्वमेघ पाटील, दिपक शेलार, जयेश मोर व देवेंद्र मोर हे तर प्रमुख अतिथी म्हणून किसान महाविद्यालयाचे डॉ. माणिक बागले व मारवड महाविद्यालयाचे डॉ. जितेंद्र माळी व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

