तलाठ्यांना कपाळी गावठी कट्टा लावून वाळू माफी्यांनी केली मारहाण…..

अमळनेर शहर प्रतिनिधी, येथील पांजरा नदी मध्ये अवैध रित्या वाळू उपसा करणाऱ्यांना मज्जाव करण्यासाठी गेलेल्या महसूल कर्मचाऱ्यांना गावठी कट्टाचा धाक दाखवत केली मारहाण.

      सविस्तर वृत्त की, तालुक्यात वाळू माफी्यांची मुजोरी वाढत असल्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहे. दिवसा ढवळ्या सरास पणे वाळू वाहतूक केली जात आहे. वाळू माफी्यांची वाढती मुजोरी याला कारण म्हणजे महसूल चा कानाडोळा की अर्थकारण, असा सवाल सुज्ञ नागरिक करीत आहे.यावर कडक उपाय योजना करने आवश्यक आहे.

      नागरिकांची ओरड पाहता अमळनेर प्रांतधिकारी भंगाळे व तहसीलदार सुराणा यांनी मंडळ अधिकारी सह तलाठ्यानं अवैध वाळू चोरी करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी आदेश दिले. त्या प्रमाणे दि ६ रोजी रात्री 08.00 वाजेच्या सुमारास मंडळ अधिकारी पुरुषोत्तम पाटील,संदीप माळी ग्राम महसुल अधिकारी मंडळ, जितेंद्र दिलीप पाटील ग्राम महसुल अधिकारी शिरसाळे बु।।,मधुकर राजधंर पाटील ग्राम महसुल अधिकारी जैतपोर, पवनकुमार सुधाकर शिंगारे,ग्राम महसुल अधिकारी सावखेडा, दिपक बन्सीलाल पाटील ग्राम महसुल अधिकारी डांगर बु।। असे अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुक प्रतिबंध करण्याकरीता खाजगी मोटर सायकलने वावडे, जवखेडा, अचळवाडी गावी अवैध गौणखनिज प्रतिबंध बाबत गस्त करीत दिनांक 07/12/2025 पहाटेच्या रात्री 01.00 वाजलेल्या सुमारारास मंडळ ता. अमळनेर शिवार पांजरा नदीकाठी गावविहरी जवळ पोहचले असता त्याचवेळी तेथे एक पिवल्या रंगाचे जेसीबी क्र. MH 15 BW 9459. एक निळ्या रंगाचे ट्रॅक्टर विना क्रमाकाचे व एक हिरव्या रंगाचे ट्रॅक्टर विना क्रमाकाचे असे पांजरा नदीपात्रात ट्रॉलीत वाळु भरलेली विना क्रमांकाची उभे होते. व निळ्या रंगाच्या ट्रॅक्टर ट्रोलीत जेसीबी साह्याने पांजरा नदीपात्रातुन वाळु उत्खनन करुन ट्रॅक्टर ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये भरीत असतांना दिसले म्हणुन महसूल पथकाने ओळख दाखवुन जेसीबी चालक व ट्रॅक्टर चालक यांना तुमच्‍याकडे वाळु भरण्याचा व ती वाहतुकीचा परवाना आहे का असे विचारले असता त्यांना उडवा उडवडची उत्तरे देवुन हुज्जत घालु लागले. म्हणुन पथकाने त्यांना दोन्ही ट्रॅक्टर चालक व जेसीबी चालक यांना सांगितले की तुमच्याकडे वाळु उत्खनन व वाहतुक करण्याचा परवाना नसल्याने आपण करीत असलेले कृत्य बेकायदेशीर असल्‍याने तुम्ही जेसीबी व दोन्ही ट्रॅक्टर तहसिल कार्यालय अमळनेर येथे नेण्याच्या सूचना देता असतांना त्याच वेळी सदर ठिकाणी 5 ते 6 मोटार सायकलवर स्वार तोंडावर 10 ते 12 अनओळखी इसम त्यांच्या हातात लाठ्या काठ्या घेवुन आले व त्यानीं महसूल कर्मचारी यांना शिवीगाळ करुन ट्रॅक्टर व जेसीबी सोडुन द्या नाहीतर तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली.त्यातील एका इसमाने महसूल कर्मचारी जितेंद्र दिलीप पाटील यांच्या चेह-यावर व डोळ्यावर त्याने आणलेल्या एका स्प्रे बॉटल मधील स्प्रे मारला त्यामुळे त्यांच्या डोळ्यात व चेह-यावर जळजळले व दुस-या एका इसमाने त्याच वेळी त्यांच्या हातातील काठीने जितेंद्र दिलीप पाटील यांच्या उजव्या पायावर मारले त्या वेवेळी त्यांच्यातील एक इसम पुढे येवुन मंडळ अधिकारी पुरोषोत्तम पाटील यांच्या कपाळावर गावठी कट्टा लावून धाक दाखवून जर तुम्ही येथुन निघाला नाही तर तुम्हाला जिवे ठार मारून टाकेल व यापुढे तुम्ही नदीपात्रात आलात तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देवुन दोन्ही ट्रॅक्टर व जेसीबी चालक हे दोन्ही ट्रॅक्टर व जेसीबी सह व त्यासोबत असलेले मोटर सायकल स्वार असे सर्व सदर ठिकाणीहून मुद्दयामासह पळून गेले.सदर झालेला प्रकार हा मा.प्रांतधिकारी भंगाळे व तहसिलदार सुराणा यांना कळवला व झालेला प्रकाराबाबत मारवड पोलीस स्टेशन येथे वरील जेसीबी क्र.MH 15 BW 9459 चालक व दोन्ही ट्रॅक्टर चालक व 5 ते 6 मोटारसायकल वर आलेले सर्व अनोळखी इसम यांच्या विरुद्ध फिर्याद देण्यात आली आहे.

       विशेष करून तालुक्यातील पत्रकारांनी अवैध वाळू उपसा बाबत वारंवार बातम्या सह सूचना महसूल कार्यालयास दिल्या आहेत. महसूल पथकास एक पोलीस कर्मचारी कारवाईस दिला असताना महसूल कर्मचारी त्यांना सोबत का घेत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचे गोडबंगाल काय आहे, हा संशोधनाचा भाग ठरत आहे. यापुढे पोलीस संरक्षणात कारवाई करावी ही माफक इच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!