मनसेच्या रेट्याने डांगरी प्र मधील निम्म तापी प्रकल्प बाधित घरांचे सर्वेक्षण सुरू

 

अमळनेर प्रतिनिधी, येथील प्रं डांगरी गाव निम्म तापी प्रकल्प पाडळसरे अंतर्गत बाधित क्षेत्र 240 घरांची पडझड होत असल्याने त्वरित सर्वेक्षण करून बाधित कुटुंबाचे पुनर्वसन व मदत कार्य करणेकामी मनसे ने उच्च स्तरावरून पाठपुरावा केल्याने शासनाने पडझड होत असलेल्या घरांचे सर्वेक्षण सुरू केले आहे.

निम्मा तापी प्रकल्प योजने अंतर्गत पाडळसरे धरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे.मात्र या धरणाच्या बॅक वॉटर मुळे अनेक गावं पाण्याखाली येत असल्याने त्यांचे पुनर्वसन करने गरजेचे असूनही सरकार या कडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप बाधित नागरिक करीत आहे.राजकारणाच्या आखाड्यात सदर धरण अडकल्याची भावना जनसामान्यांची झाली आहे.सदर धरण पूर्ण करणे व गावांचे पुनर्वसन या करीता लागणारा निधी दिवसेंदिवस वाढतच आहे.तालुक्यातील सात्री सह डांगरी प्रगणे गावातील बाधित कुटुंबाचे त्वरित पुनर्वसन होणे गरजेचे असताना या कडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.

निम्म तापी प्रकल्प योजने अंतर्गत पाडळसरे धरणाच्या बॅक वॉटर मुळे डांगरी प्रगने येथील जवळ जवळ २३० घरामध्ये पाणी घुसत असल्याने त्या कुटुंबाचे जीवनमान विस्कळीत झाले आहे.त्यानां अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.पैकी काही घरांची पडझड होत आहे.मात्र तेथील बाधित नागरिक सातत्याने जिल्हाधिकारी कार्यालय सह निम्म तापी प्रकल्प अधिकारी यांच्या कडे वांरवार समस्या लेखी सह तोंडी निवेदन देऊन ही त्यांच्या या समस्या कडे दुर्लक्ष करीत असल्याने बाधित नागरिक जल समाधी आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.गेल्या 2 ते 3 महिन्यापासून बाधित नागरिक वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करून ही दुर्लक्ष करीत असल्याने मनसे चे तालुका उपाध्यक्ष शामकांत बडगुजर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस नितीन दादा चौधरी व जिल्हाध्यक्ष मुकुंदा भाऊ रोटे व तालुका अध्यक्ष संदीप पाटील काटे यांच्या कडे बाधित कुटुंबाची समस्या मांडली.त्यामुळे मनसे चे वरिष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी मा राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनात न्याय मिळवून देण्यासाठी उच्च स्तरावरून पाठपुरावा करून बाधित कुटुंबाचे पुनर्वसन व्हावे व त्यांना तात्काळ मदत मिळावी म्हणून संबधित खात्याच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.याचा परिनामे स्थानिक प्रशासनाने डांगरी प्रं गावातील बाधित कुटुंबाचे सर्वेक्षण सुरू केले आहे. बाधित कुटुंबाला मनसेने दिलेला मदतीचा हात हा त्यांच्यासाठी खुंप महत्वपूर्ण आहे.

बाधित कुटुंबाचे पुनर्वसन व्हावे याकरिता लवकरच मनसे मा.राज ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जल समाधी आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे मनसेचे सरचिटणीस नितीन चौधरी यांनी वेब न्युज पोर्टल करडी नजर ला कळविले आहे. पुढे ते म्हणाले की,

“गेल्या 18 वर्षे झाली सुरू असलेल्या या लढ्यात आता संपूर्ण प्रकल्प पिढीत च्या पाठीशी पक्ष उभा आहे.या प्रकरणावर माझे बारीक लक्ष असुज कायदेशीर व प्रशासकीय बाबी तपासण्याचे काम आमच्या तर्फे सुरू आहे.सदर प्रकरणात लवकरच एक नियोजन बद्ध आंदोलनाची आखणी या झोपलेल्या सरकार चे डोळे उघण्या साठी मनसे तर्फे करून या प्रकल्पग्रस्त ना न्याय मिळवून देण्याचे काम आम्ही नक्की करू”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!