पो. नि. दत्तात्रय निकम यांचे नियोजन व दामिनी पथकाच्या कारवाईने प्रेम युगल सापळ्यात…

अमळनेर येथील दामिनी पथकाने काही महाविद्यालयीन शाळकरी तरुण तरुणीनां परिसरात अज्ञात स्थळी प्रेम चाळे करतांना रंगे हाथ पकडून समज देऊन पालकांच्या दिले ताब्यात.

   अमळनेर शहर हें शिक्षणाचे माहेर घर म्हणून ओळखले जात असल्याने शहरातील महाविद्यालयात शिक्षणासाठी तालुक्यातील अनेक गावातील व इतर जिल्ह्यातील विद्यार्थी येत असतात. मात्र गेल्या काही दिवसा पासून काही विद्यार्थी व विद्यार्थिनी हें शाळा कॉलेज बुडवून प्रेम चाळे करण्यासाठी परिसरातील अज्ञात ठिकाणी जात असल्याची चर्चा शहरात होत होती. त्याला पायबंद बसावा म्हणून अमळनेर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी श्री दत्तात्रय निकम यांनी आपल्या दामिनी पथकाला योग्य ते सूचना देऊन कारवाई करण्यास सूचित केले. त्या प्रमाणे मोनिका पाटील, नम्रता जरे, मिलिंद सोनार,श्यामल पारधी, गजेंद्र पाटील या पोलीस कर्मचाऱ्यांनी शहरातील अंबर्शी टेकडीच्या झाडजुडपात प्रेम चाळे करीत असलेल्या गलवाडे येथील दोन तरुणी, धुळे येथील एक मुलगी व दोंडाईचा येथील दोन मुलं आणि गलवाडे गावातील एक तरुण यांना रंगेहाथ पकडले.दामिनी पथकाने या प्रेमी युगलानां पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या समोर हजर केल्याने निकम यांनी प्रेमी युगलांच्या पालकांना बोलावून समज देऊन रवाना केले.याप्रसंगी पालकांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले.या कारवाई मुळे दामिनी पथकावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

श्री दत्तात्रय निकम, पोलीस निरीक्षक —

पालकांनी आपले पाल्य शिक्षणासाठी किती वेळ बाहेर जात आहे. कोणासोबत मैत्री करीत आहे, याबाबत सातत्याने चौकस राहणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!