महसूल अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या….न्यायाल्याने आरोपीना दिली पाच दिवसांची पोलीस कोठडीचे आदेश.

अमळनेर शहर प्रतिनिधी, येथील मांडळ गावातील पांजरा नदी परिसरात वाळू तस्कर यांनी महसूल कर्मचारी यांना जीवे मारण्याची धमकी सह मारझोड करून पसारा झालेल्यांच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या.

        सविस्तर वृत्त की, दि ७ रोजी महसूल पथकाला मध्यरात्रीला पांजरा नदी काठी काही इसम जेसीबी द्वारे ट्रॅक्टर मध्ये वाळू भरतांना दिसलें असता त्यांना पथकाने याबाबत विचारपूरस करत असताना मोटार सायकल वरून आलेल्या दहा ते बारा लोकांनी महसूल अधिकारी पुरुषोत्तम पाटील यांच्या कपाळाला गावठी बंदूक लावून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच दुसरे कर्मचारी जितेंद्र पाटील यांच्या डोळ्यावर तिखट स्प्रे मारून हातावर काठीने मारहाण केली व ट्रॅक्टर सह जेसीबी घेऊन पसार झाले होते.वाळुमाफिया द्वारे पथकातील अधिकारी व कर्मचारी यांचै वर सशस्त्र जिवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपींना त्यांचे कडील शस्त्रासह तात्काळ अटक करून त्यांचे वरभारतीय न्याय संहिता २०१३ मधील कलम १०९ व ३०९ (पुर्वीचा भा.द.वि.कलम ३०७ व ३१० ) चा फिर्यादीत समावेश करण्यात यावा व MPDA, महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधीत कायदा (मोक्का) अंतर्गत कार्यवाही व्हावी तसेच घटनेतील सर्व आरोपींना मुद्देमाल व शस्त्रासह अटक होत नाही तोपर्यंत निवडणुक व नैसर्गिक आपत्तीचे कामकाज वगळून अमळनेर तालुका ग्राम महसूल अधिकारी संघ, तसेच ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील सर्व मंडळ अधिकारी, अव्वल कारकुन व नायब तहसिलदार हे कामबंद आंदोलनाचा इशारा दिला होता.

    सदर झालेली घटना दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर (पवार) यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी, विनायक कोते यांनी गुन्ह्याचे घटनास्थळी भेट देवून गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध घेवुन गुन्ह्यातील आरोपी व गुन्हयाचे घटनास्थळी असलेले ट्रॅक्टर व जे सी बी मशीन गुन्हयाकामी ताब्यात घेण्याचा सुचना दिलेल्या होत्या. गुन्हयाचे तपासात मारवड पोलीस स्टेशन कडील तपास पथक स.पो. नि. जिभाऊ पाटील, पोउपनिरी. विनोद पवार, ग्रेड पोउपनिरी. संजय पाटील, स.फो. फिरोज बागावान, पोहेका संजय पाटील यांनी व स्थानिक गुन्हे शाखा जळगांव कडील पोहेकां हरीलाल पाटील,पोहेकां प्रविण मांडोळे, पोहेकां संदिप पाटील, पोकां राहुल कोळी यांनी आरोपीतांचा शोध घेवुन आरोपी नामे सागर अशोक कोळी, विकास पाटील,किरण कोळी असे तीन आरोपीतांना अटक करून न्यायालयात हजर केले असता सन्मानीय न्यायालयाने आरोपीना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असुन पुढील तपास पोउपनिरी. विनोद पवार करीत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!