बी. एड. प्रवेश इच्छुकांनी ऑनलाईन सीईटी करीता नोंदणी करावी – प्राचार्य डॉ प्रभाकर चौधरी 

 

अमळनेर : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी बी.एड.(जनरल व स्पेशल), बी.एड. (इलेक्टिव्ह)अ भ्यासक्रमांच्या सीईटी प्रवेश नोंदणीस गुरुवारपासून सुरुवात झाली. यासाठी विद्यार्थ्यांना २३ जानेवारीपर्यंत ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करता येणार असल्याचे नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी. पी. चौधरी यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे कळविले आहे.

     सविस्तर वृत्त असे की, राज्य परीक्षा कक्षाने आतापर्यंत एमपीएड, एमएड, एमसीए,एम.एचएमसीटी,बी.एड. आणि ३ वर्षीय एलएल.बी. अशा सहा अभ्यासक्रमांच्या सीईटी नोंदणीस सुरुवात केली आहे.

     संभाव्य वेळापत्रका नुसार बी.एड. सीईटी दि.२७ ते २९ मार्चला तर एलएल. बी. साठीची परीक्षा १ ते २ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे.उर्वरित व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटी नोंदणीसही लवकरच प्रारंभ करण्यात येणार असल्याचे कक्षाने कळवले आहे.

     डॉ पी. पी. चौधरी, प्राचार्य,नवलभाऊ प्रतिष्ठान शिक्षणशास्त्र महाविद्यालय, अमळनेर यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे कळविले आहे की,बी. एड अभ्यासक्रमां साठीचा ऑनलाइन अर्ज, सविस्तर माहिती पुस्तिका कक्षाच्या www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असून इच्छुकांनी त्वरित ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करावे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!