अमळनेर श्रीमती द्रौ.रा. कन्या शाळेत तालुका विधी सेवा समिती आणि वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शाळेच्या मुख्याध्यापिका एस.एस. सूर्यवंशी यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.कार्यक्रमात सह-दिवाणी न्यायाधीश एन.आर.यलमाने यांनी विद्यार्थिनींना कलम 14, कलम 39(अ) याबाबत सविस्तर मार्गदर्शन करताना केंद्र व राज्य विधी सेवा प्राधिकरणांतर्गत दिव्यांग, भूकंपग्रस्त, बालकं, स्त्रिया यांना मिळणाऱ्या मोफत विधी सेवेची माहिती दिली.पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी 16 ते 18 वयोगटातील मुलींनी स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.विधी सेवा संघाचे ऍड. के. आर. बागुल यांनी मोबाईलचा योग्य वापर, सोशल मीडियावरील धोके, ऑनलाइन गेमिंगची व्यसनाधीनता, तसेच अश्लील सामग्रीपासून दूर राहण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या. ऍड.आर.डी.कच्छवा यांनी मतदानाचा अधिकार, पास्को कायदा, आणि गुड टच – बॅड टच या महत्त्वाच्या विषयांवर विद्यार्थिनींना जागृत केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. एन. पालवे यांनी केले, तर आभार प्रदर्शन एस. पी. वाघ यांनी मानले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी तालुका विधी सेवा समिती, वकील संघ, तसेच शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
अमळनेर येथील नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयात वंन्दे मातरम गीताचे सामूहिक गायन संपन्न सविस्तर वृत्त की, भारत देश पारतंत्र्यात असतांना…
नवलनगर येथील .एन.बी. कला महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या या पावन प्रसंगी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व नूतन उच्च माध्यमिक विद्यालय…