अमळनेर तालुक्यातील अपूर्ण घरकुले तातडीने पूर्ण करा! लाभार्थ्यांच्या समस्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला निवेदन

अमळनेर : प्रधानमंत्री आवास, शबरी आवास व रमाई आवास योजनेंतर्गत मंजूर झालेली अनेक घरकुले निधीअभावी व प्रशासकीय अडचणींमुळे अपूर्ण असून, लाभार्थ्यांचे रखडलेले अनुदान व हप्ते तातडीने वितरित करून त्यांच्या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (DRDA), जिल्हा परिषद जळगाव यांच्या प्रकल्प संचालकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

पात्र लाभार्थ्यांच्या प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करून अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे, अशी मागणीही करण्यात आली.

यावेळी ईश्वर उखा पाटील, योगराज निंबा कोळी, शरद विनायक पाटील, प्रकाश बोरसे, कृष्णा पाटील, रामदास पाटील, दिलीप मधुकर चौधरी व भूषण गोपीचंद कोळी उपस्थित होते. घरकुल लाभार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत संघटनेच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!