अमळनेर : विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्यूनिअर कॉलेजच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे. विद्यालयाचा माजी विद्यार्थी उमेेश पवार (रा. बाभुळवाडी, ता. अमळनेर) याची भारतीय सैन्य दलात टेक्निकल विभागात (Technical Department) निवड झाली आहे. विशेष आणि अत्यंत अभिमानास्पद बाब म्हणजे उमेश याच्यासोबतच त्याच्या सख्ख्या भावाचीही सैन्य दलात निवड झाली असून, दोन्ही सख्ख्या भावांनी देशसेवेचे स्वप्न साकार करत अमळनेर तालुक्याचा गौरव वाढवला आहे.
दोन्ही बंधूंना आर्मी स्कूलचे माजी कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील सर यांचे मोलाचे व अचूक मार्गदर्शन लाभले. त्यांच्या खडतर परिश्रमाला आणि मार्गदर्शनाला अखेर यश आले असून, दोघांची सैन्य दलात निवड झाल्याने बाभुळवाडी ग्रामस्थांसह संपूर्ण तालुक्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
आर्मी स्कूलसाठी अभिमानास्पद कामगिरी:
विजयनाना पाटील आर्मी स्कूलमधून शिस्त आणि देशप्रेमाचे धडे घेतलेले विद्यार्थी आज देशाच्या कानाकोपऱ्यात संरक्षण क्षेत्रात आपली सेवा देत आहेत. याच परंपरेत आता पवार बंधूंची भर पडली आहे. एकाच घरातून दोन तरुण देशाच्या संरक्षणासाठी सज्ज झाल्याने आर्मी स्कूल प्रशासनानेही या यशाचे विशेष कौतुक केले आहे. सैन्य दलात निवड होणे ही आपल्या आर्मी स्कूलसाठी अत्यंत अभिमानाची आणि गौरवशाली गोष्ट असल्याचे विद्यालयाकडून सांगण्यात आले.
पवार बंधूंच्या या ऐतिहासिक यशाबद्दल त्यांचे माजी केंद्रीय मंत्री तथा शिक्षण महर्षी नानासाहेब विजय नवल पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील उज्ज्वल आणि यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.तसेच संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि अमळनेर वासीयां तर्फे अनंत कोटी शुभेच्छा देण्यात येत आहेत.
अमळनेर प्रतिनीधी येथील नवीन माध्यमिक विद्यालय अंतूर्ली-रंजाने विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक आदरणीय नानासाॊ.श्री पी डी पाटील सर त्यांच्या अनमोल अश्या प्रदिर्घ…