इतिहास सामाजिक शास्त्राची एक जननी आहे – प्रा.विजय साळुंखे

अमळनेर येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त),अंतर्गत करियर कौन्सिलिंग सेंटर,राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान,अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 15 दिवसीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कोर्समध्ये दिनांक 29 जानेवारी 2025 रोजी पूज्य साने गुरुजी सभागृहात सकाळी 10 ते 12 दरम्यान इतिहास विभागाचे सहाय्यक प्राध्यापक विजय साळुंखे यांनी *स्पर्धा परीक्षा आणि इतिहास* या विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण असे मार्गदर्शन केले.

प्रा.साळुंखे म्हणाले की,इतिहास हा विषय प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक स्वरूपाचा आहे.या तिन्ही कालखंडातील महत्त्वाच्या घडामोडीचा आढावा त्यांनी यावेळी घेतला.ते बोलताना असे म्हणाले की,भूमी अनुदान कायदा,सामंतशाही पद्धती, इतिहास सामाजिक शास्त्राची एक जननी आहे,यावेळी इतिहासाच्या विविध संकल्पनांची वस्तुनिष्ठ स्वरूपाची मांडणी प्रा.साळुंखे यांनी केली. प्रस्तुत मांडणी करताना मानववंशशास्त्र या विचार संकल्पनाचा देखील सविस्तरपणे आढावा घेतला.प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विषयाचे प्रा.योगेश पाटील यांनी केले तर आभार डॉ.जितेंद्र पाटील यांनी मानले.याप्रसंगी करिअर कौंसेलिंग सेंटरचे प्रमुख डॉ.विजय तुंटे उपस्थित होते.

सदर मार्गदर्शनपर व्याख्यानाच्या यशस्वीतेसाठी डॉ.आर सी सरवदे, प्रा.अमोल अहिरे, प्रा.हिमांशू गोसावी, करिअर कौन्सिलिंग सेंटरचे दिलीप शिरसाट,पराग पाटील, अतुल धनगर, विशाल अहिरे आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!