प्रताप’ मध्ये व्यावसायिक उद्दिष्टे साध्य करणे यावर परिसंवाद संपन्न

अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर व राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेल अंतर्गत दि. २७.०१.२०२५ रोजी “Achieve Professional Goals” या विषयावर एकदिवसीय परिसंवाद दोन सत्रांमध्ये आयोजित करण्यात आला.


सकाळच्या सत्रात कला व विज्ञान शाखेतील एम. ए., व एम. एस्सी. च्या विद्यार्थ्यांनी तर दुपारच्या सत्रामध्ये एम. कॉमच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी प्राचार्य प्रा.डॉ.ए.बी.जैन, उप प्राचार्य डॉ.अमित पाटील, IQAC Co-ordinator डॉ.मुकेश भोळे, प्रा. एस.एस.दिपके व प्रा डाॅ किरण सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व वक्ता श्री राजेंद्र वर्मा (Mentor Academic Advisor), नाशिक हे त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. रमा वर्मा (Nutritionist) यांच्यासह मार्गदर्शन करण्याकरिता उपस्थित होते. श्री. राजेंद्र वर्मा यांनी विद्यार्थ्यांना *career development* साठी ध्येय निश्चित कशा प्रकारे केले पाहिजे, ह्या विषयावर सखोल मार्गदर्शन केले तसेच सौ. रमा वर्मा यांनी *निरोगी आयुष्य* जगण्यासाठी कोणता आहार घेतला पाहिजे या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

सदर कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी विज्ञान विभागातून Placement Committee चे समन्वयक प्रा. डॉ. तुषार व्ही. रजाळे, प्रा.संतोष एस.दिपके,, प्रा.वृषाली वाकडे ,प्रा. वैशाली राठोड , प्रा.पुष्पा पाटील व प्रा.डॉ. वंदना भांमरे यांनी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी तर वाणिज्य शाखेतून प्रा. डॉ. किरण सूर्यवंशी व कला शाखेतून प्रा.एस बी नेरकर यांनी सहकार्य केले. सदर कार्यशाळेचे समन्वयक म्हणून प्रा.संतोष दिपके व डॉ.किरण सूर्यवंशी यांनी यशस्वीपणे भूमिका बजावली.

प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.एस एस दिपके यांनी केले तर प्रा डॉ किरण सूर्यवंशी यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!