अमळनेर : येथील नामवंत खान्देश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती द्रौपदीबाई रामचंद्रशेठ कन्या शाळेत २३ जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस’ मोठ्या उत्साहात आणि क्रीडामय वातावरणात साजरा करण्यात आला. शालेय स्तरावरूनच विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी आणि भविष्यात देशासाठी ऑलिम्पिक पदक विजेते खेळाडू घडावेत, या उदात्त हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

