अमळनेर : नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने रविवार, १६ नोव्हेंबर रोजी देखील ऑफलाईन पद्धतीने नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचे आदेश सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले आहेत.यामुळे उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे.

