अमळनेर-ग्रामिण भागात गाव गाड्याचा कारभार करताना सरपंच आपल्या गावाचाच लागतो म्हणून आमदारही आपल्या गावाचाच हवा,बाहेरच्याना संधी देण्याचा कोणताही प्रश्न नाही अशी प्रतिक्रिया बाजार समितीचे संचालक तथा अमळनेर पंचायत समितीचे माजी सभापती भोजमल पाटील पाटील यांनी देत विकासपुरुष भूमिपुत्र म्हणून अनिल भाईदास पाटील यांनाच विजयी करण्याचे आवाहन केले आहे.
महायुतीचे उमेदवार अनिल भाईदास पाटील यांनी ग्रामिण भागात दौरा केला असता भोजमल पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.यावेळी ते म्हणाले की आमदार कसा असावा?त्याचे व्हिजन कुणासारखे असावे? आणि त्यांच्याकडून विकास कसा व्हावा असा प्रश्न कुणीही केला तरी सहजच आमच्या सारख्यांच्या मुखावर एकच नाव येईल ते म्हणजे अनिल भाईदास पाटील.अनिल दादांमुळे शेतकरी बांधवांसाठी येणारा काळ अत्यंत सुगीचा असून निश्चितच प्रत्येक शेतकरी कुटुंबाचे जीवनमान सुधारण्याचे हे संकेत आहेत. अश्या कर्तबगार व्यक्तिमत्वास आपण पुन्हा संधी दिलीच पाहिजे.
अनिल दादा आमदार नव्हते तेव्हा आणि आमदार व मंत्री झाल्यावर देखील प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी होत आले असून जनतेसाठी 24 तास उपलब्ध असणारे ते आमदार ठरले आहेत.शहरात देखील अनिल दादा विकासाच्या बाबतीत कुठेही मागे नसून शहर व ग्रामिण भागात सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.अश्या कर्तबगार व्यक्तिकत्वास आपल्याला पुन्हा संधी द्यायची असून बाहेरच्या व्यक्तींना कायमचा बाहेरचा रस्ता आपल्याला दाखवायचा असल्याचे आवाहन भोजमल पाटील यांनी केले आहे.
