अमळनेर : श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी, अमळनेर संचलित समाजकार्य महाविद्यालयातील प्रा. धनराज ढगे यांनी समाजकार्य विषयात पीएच.डी. पदवी प्राप्त करून आपल्या शैक्षणिक यशात मानाचा तुरा रोवला आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्याकडून त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली.

