अमळनेर : मातोश्री नगरातील चामुंडा माता मंदिराजवळ बांधकामाच्या ठिकाणी साहित्य घेऊन जाण्याच्या कथित प्रयत्नाला अटकाव करताना झालेल्या झटापटीत विजय बडगुजर यांच्या हाताच्या बोटाला चावा घेऊन गंभीर दुखापत केल्याचा आरोप असलेल्या संशयिताला अमळनेर पोलिसांनी अवघ्या तासाभरात ताब्यात घेतले.

