गंगापुरी (प्रतिनिधी) : येथील जिल्हा परिषद शाळेत कै. लहू शामराव बि-हाडे व कै. सोनाबाई लहू बि-हाडे यांच्या स्मरणार्थ प्रा. डॉ. शरद लहू बि-हाडे (धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर) यांच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स गणवेशाचे वाटप करण्यात आले.

