खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते श्रीमती द्रौ.रा.कन्या शाळेत विद्यार्थिनींचे स्वागत सह पाठयपुस्तकांचे वाटप..

अमळनेर,येथील खा.शी मंडळ संचलित श्रीमती द्रौ.रा.कन्या शाळेत शाळा प्रवेशोत्सव अंतर्गत खासदार स्मिता वाघ यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी पालकांसह विद्यार्थ्याचे स्वागत केले . महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.त्यावेळी शाळेच्या परिसरात आपल्या पाल्यासह बरेच पालक उपस्थित होते.

त्यावेळी जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ, गटशिक्षणाधिकारी रावसाहेब मांगो पाटील, शाळेचे चेअरमन निरज अग्रवाल, संचालक हरी अण्णा वाणी, योगेश मुंदडे, प्रदीप अग्रवाल, डॉ.संदेश गुजराथी,शाळेच्या मुख्याध्यापिका एस. एस. सूर्यवंशी,पर्यवेक्षिका एस.पी. बाविस्कर, राणे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका भारती आठवले,जी.एस हायस्कूलचे मुख्याध्यापक व्ही.एम.कदम,ज्येष्ठ शिक्षक एस.एस माळी,करुणा शिक्षक डी.एन पालवे यांनी आलेल्या सर्वांचे स्वागत केले. सर्व शिक्षकांनी नवागत विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव केला.सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत झाल्यानंतर स्मिता वाघ यांनी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना पुस्तक वाटप केले.सूत्रसंचालन श्रीमती. एस.एस.देवरे तर आभार मुख्याध्यापिका एस.एस. सूर्यवंशी यांनी केले. नवोगत प्रवेशोत्सव यशस्वी करण्यासाठी शाळेच्या सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!