अमळनेरमध्ये २५ ते ३० वर्षीय तरुणाचा बेवारस मृतदेह आढळला; ओळख पटवण्याचे पोलीस स्टेशनचे आवाहन

अमळनेर:शहरातील दाजीबा नगर परिसरामध्ये एका अनोळखी तरुणाचा मृतदेह बेवारस स्थितीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस मृताच्या वारसांचा शोध घेत आहेत.
​मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २ जून २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजेच्या सुमारास दाजीबा नगर येथील कच्च्या रस्त्याच्या बाजूला एका २५ ते ३० वर्षे वयोगटातील अनोळखी पुरुषाचे प्रेत आढळून आले.

​मृताचे वर्णन खालीलप्रमाणे आहे:

​वय: अंदाजे २५ ते ३० वर्षे
​रंग: सावळा
​उंची: अंदाजे ५ फूट ३ इंच
​चेहरा व नाक: लांबट चेहरा आणि सरळ नाक
​केस: काळे
​अंगातील कपडे: निळसर रंगाचा टी-शर्ट आणि राखाडी (ग्रे) रंगाची पॅन्ट
​इतर खूण: उजव्या हातात स्टीलचे कडे आणि लाल दोरा बांधलेला आहे.

​पोलीस प्रशासनाचे आवाहन

​या घटनेप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यू रजि. ५६/२०२६, BNSS २०२३ चे कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल (पोहेकॉ/२८९७) विनोद भोई हे करीत आहेत.

​वर नमूद वर्णनाचा तरुण किंवा त्याच्या नातेवाईकांबाबत (वारसांबाबत) कोणालाही काहीही उपयुक्त माहिती मिळाल्यास, त्यांनी तातडीने तपास अंमलदार यांच्या मोबाईल नंबर: ७३०४१६६१४८ किंवा अमळनेर पोलीस स्टेशनच्या ०२५८७-२२३३३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अमळनेर पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!