अमळनेर: दुधाची प्रत (फॅट) कृत्रिमरीत्या वाढवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या एका बनावट दूध निर्मिती अड्ड्यावर अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि अमळनेर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मोठा पर्दाफाश केला आहे. जानवे-इंदपिंप्री रस्त्यावरील पत्री शेडमध्ये सुरू असलेल्या या कारखान्यातून महेश दिलीप पाटील (वय २७) याला रंगेहात अटक करण्यात आली आहे.

