अमळनेर शहर प्रतिनिधी, तालुक्यातील गडखाम्ब शिवारात सुरेश लोटन पाटील यांच्या शेतात पोलिसांनी धाड टाकून जवळपास साडेतीन कोटी किमंतीचा गांजाचे एक बिघा क्षेत्र उध्वस्त केले असून ओला व सुका गांजा पकडला आहे.
पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकमयाना गोपनीय माहिती मिळाली की गडखाम शिवारात गट नम्बर २३२४ मध्ये एका शेतकऱ्याने गांजाची लागवड केला आहे. त्यांनीडीवायएसपी विनायक कोते यांची परवानगी घेऊन तहसीलदार रुपेशकुमार सुराणा याना पंचनाम्यासाठी घेऊन पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ ,पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज , पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर , हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार , विनोद संदानशिव ,प्रशांत पाटील, निलेश मोरे , नितीन मनोरे ,सुनील तेली , विनोद सोनवणे , राहुल पाटील ,उदय बोरसे , सिद्धांत शिसोदे , गणेश पाटील ,संजय सोनवणे , गणेश पाटील , श्यामल पारधी ,निलेश पाटील , विनोद पाटीलयांना घेऊन ७ रोजी सकाळी ६ वाजता छापा टाकला. गडखाम्ब येथील सुरेश लोटन पाटील या शेतकऱ्याने मका सोबत शेतात गांजा लावलेला आढळून आला. सुमारे सहा फूट उंचीची झाडे उगवलेली होती. शेतकऱ्याने शेतात पाच ते सात गोण्या ओला गांजा बांधून ठेवलेला दिसून आला. तसेच एका ठिकाणी गांजा वाळवायला ठेवलेला दिसला. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांने गांजा विकल्याचे देखील कबुल केले. फॉरेन्सिक पथकाने देखील पंचनामा केला.
अंदाजे तीन टन गांजा भरण्याची शक्यता आहे.कायदेशीर प्रक्रिया रात्री पर्यंत सुरूच होती.सर्व झाडे उपटवून मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी शेतकऱ्यासह दोन संशयिताना चौकशी करीता ताब्यात घेतले असल्याचे कळतं.तालुक्यात अशी कारवाई प्रथमच केल्याने पोलीस प्रशासनाचे कौतुक केले जात आहे.
चोपडा तालुक्यातील गांजा पीकविण्याचे लोन अमळनेर मध्ये आल्याने चर्चेला उधान आले आहे. शेतकऱ्याला गांजा पीकविण्याची वेळ का वं कोणी आणली, सदर शेतकऱ्याला अजून कोणाचा पाठींबा होता, बिट हवालदार यांच्या पासून ही माहीती कशी लपून राहिली,असे अनेक प्रश्न सामाजिक माध्यमावर उपस्थित केले जात आहे.