अमळनेर प्रतिनिधी ,शहरासह तालुक्यात सट्टा व मटका या सारख्या अवैध धंद्याचा स्तोम माजल्याने अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत असल्याने हाहाकार उडाला आहे.
अमळनेर शहराच्या गल्ली – बोळामध्ये व काही खेडे गावांमध्ये देखील सट्ट्यांची उपदुकाने सुरू आहेत. सट्टा मटका खेळणे व खेळवणे दोन्ही गुन्हे आहेत. मात्र खेळणारे व खेळवणारे कोणलाही घाबरत नसल्याचे दिसून येते. सट्टा खेळण्याची वाईट सवय लोकांना लागत असल्याने अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत मात्र सट्ट्याच्या माध्यमातून शॉर्टकट पैसा मिळवण्याच्या आमिषाने अनेक लोकं खेळताना दिसत आहे.यामुळे सट्टे खेळणारे व खेळवणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.सरकारने या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी सरकारच्या लाडक्या बहिणी करीत आहे.
जनतेची आर्थिक लूट…
कमी वेळात पैसे कमावण्याचे आमिश दाखवून सट्टा चालक लोकांना गंडवत असतात.लोभा मुळे अनेक जन आपली मिळकती सह मालमत्ता विकून सदर जुगार ते खेळत असल्याने अनेक कुटुंब रस्त्यावर आले आहे.
प्रशासनाने लक्ष देण्याची गरज…
अमळनेर मध्ये सट्टा – मटका खेळणारे व खेळवणारे यांची संख्या वाढत असल्याने ही बाब गंभीर असल्याने प्रशासनाने याकडे गंभीरतेने लक्ष देणे गरजेचे आहे. सट्टा मटका चालक हे प्रशासनाला घाबरत नसल्याचे दिसून येत आहे.कारण सट्टा हा सर्रास पणे अमळनेर शहरातील सार्वजनिक ठीक ठिकाणी खेळवला जात आहे.
*शासकीय तथा सार्वजनिक ठिकाणे झाली सट्टा बाजार…*
अमळनेर शहरातील पाचकंदील,साने गुरुजी शॉपिंग, गांधलीपुरा,नदीकाठ परिसर सह नगर परिषदेची शौचालये, नगर परिषदेच्या मालकीचे अनेक कॉम्प्लेक्स, नगर परिषदेचे नवीन मच्छी व कोंबडी बाजार जवळील भाग आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात सट्टा मटका,लाल काला,तितली खबुतर सारखे अवैध धंदे सुरू असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी गेल्यावर जणू यांचा एक वेगळा बाजारच अमळनेर शहरात सुरू झालाय असे भासू लागते.
वरील सर्व गोष्टींचा अमळनेरकरांच्या सर्व सामान्य नागरिकांच्या जीवनमानावर भयानक परिणाम होताना दिसत आहे. अवैध धंदे सार्वजनिक ठिकाणी पडद्या आड सुरू असल्याने गुन्हेगारांचे येणे जाणे होत असल्याने सर्व सामान्य नागरिकांना भीतीच्या सावटाखाली वावर करावा लागत आहे.तसेच या अवैध धंद्यांना बळी पडलेल्या व्यक्तींचे कुटुंब अर्थात सरकारने आपल्या गरीब लाडक्या बहिणीच्या उद्ध्वस्त होत असलेल्या कुटुंबाला वाचविण्यासाठी ठोस अशी कारवाई करण्याची मागणी सुज्ञ नागरिक करीत आहे.
