तब्बल बारा हजार समाजबाधवांच्या उपस्थितीत पार पडला मुस्लिम खाटीक समाजाचा सामूहिक विवाह सोहळा….

      अमळनेर मुस्लिम खाटीक पंच मंडळाच्या वतीने गुरुवार, 5 फेब्रुवारी रोजी इज्तेमा नगर येथे 20 जोडप्यांचा राज्यस्तरीय भव्य सामूहिक विवाह सोहळा यशस्वीरीत्या पार पडला.

    कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अखिल महाराष्ट्र खाटीक समाजाचे अध्यक्ष युसुफ ए. लतीफ यांनी भूषविले. कार्यक्रमाची सुरुवात वाहेद खाटीक यांनी कुराण पठणाने केली.

सोहळ्याचे वैशिष्ट्य

     सामूहिक विवाह सोहळ्यास महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश येथून सुमारे 11 ते 12 हजार समाजबांधव उपस्थित होते. या उपक्रमामुळे गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना विवाहासारख्या महत्त्वाच्या प्रसंगी वेळ व खर्चाची मोठी बचत झाली. समाजातील नागरिकांनी या उपक्रमाचे आदर्श व अनुकरणीय म्हणून भरभरून कौतुक केले.

विशेष उपस्थिती

    कार्यक्रमास अखिल महाराष्ट्र खाटीक समाजाचे माजी अध्यक्ष एल. ए. शेख, हुस्नोद्दीन, इब्राहिम सेठ, जिल्हाध्यक्ष अनवर खाटीक, गुजरात अध्यक्ष फिरोज खाटीक, फौजी शकील, मध्यप्रदेश अध्यक्ष वाहेद खाटीक, कासिम पहलवान, रईस सलीम, अकील खान (दोंडाईचा), अरमान यांच्यासह अनेक पदाधिकारी, जिल्हा व तालुका अध्यक्ष तसेच समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    माजी नगराध्यक्षा जयश्री अनिल पाटील, जळगावचे मुफ्ती हारून करीम सालार, एजाज गफ्फार मलिक, पोलीस निरीक्षक दत्तात्रेय निकम तसेच नगरपरिषदेचे अधिकारी उपस्थित राहून नवदाम्पत्यांना आशीर्वाद दिले.

यशस्वीते साठी मोलाचे सहकार्य

     कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष मुख्तार खाटीक, उपाध्यक्ष जाकीर खाटीक अब्दुल्ला, सचिव जाकीर गनी, खजिनदार इमरान यांच्यासह संपूर्ण आयोजन समितीने परिश्रम घेतले. सूत्रसंचालन जिल्हा सचिव हाजी शरीफ व महाराष्ट्र उपाध्यक्ष कैसर खाटीक यांनी केले. शेवटी जाकीर खाटीक व इमरान खाटीक यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!