अंबारे खापरखेडे येथे ‘अरूणोदय’ मोहिमे अंतर्गत समुपदेशन सत्र संपन्न…

    अमळनेर : सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शक सूचनेनूसार सिकलसेल अँनिमिया विशेष अभियान ‘अरूणोदय’ राज्यातील एकवीस आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे.त्या अंतर्गत मा.मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल मॅडम,मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.सचिन भायेकर सर,तालूका आरोग्य अधिकारी मा डाॅ.गिरीश गोसावी सर,वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र मारवड डाॅ.साहील चौधरी आणि डाॅ.विद्या देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष्यमान आरोग्य केंद्र धार ता.अमळनेर अंतर्गत अंबारे खापरखेडे येथे ‘विवाहपूर्व आणि प्रसूतिपूर्व समुपदेशन सत्र दिनांक सहा फेब्रुवारी रोजी पार पडले.

       या सत्रात सिकलसेल अँनिमिया म्हणजे काय,त्याची कारणे ,लक्षणे,उपचार व घ्यावयाची काळजी याचे सविस्तर विवेचन समुदाय आरोग्य अधिकारी डाॅ.दिनेश गोकूळ पाटील यांनी केले आणि उपस्थित लाभार्थी यांनी विचारलेल्या शंकांचे निरसन केले. सिकल सेल अँनिमिया तपासणी सरकारी रूग्णालयांत मोफत होते असे आरोग्य सेवक श्री.डी.आर.पवार यांनी सांगितले.

     सदर कार्यक्रमाला अंबारे खापरखेडा ग्रामपंचायतीचे सदस्य श्री.अभिमन्यू झिपरू रायसिंग, ग्राम पंचायत अधिकारी श्री.सुनिल पांडुरंग पाटील,प्राथमिक शिक्षक गणेश शामराव चव्हाण उपस्थित होते.

      कार्यक्रमाचे आयोजन आणि यशस्वीतेसाठी आशा स्वयंसेविका कल्पना हंसराज पाटील,अंगणवाडी सेविका सुनंदा भिकनराव देसले,मदतनीस विजया दिनेश पाटील,ग्राम पंचायत कर्मचारी हंसराज पाटील आणि पलक पाटील यांनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!