अमळनेर : अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई यांच्यावतीने घेण्यात येणाऱ्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत (गायन) या विषयातील संगीत विशारद परीक्षेत अमळनेर (जि. जळगाव) येथील कु. अनोखी गुरव हिने मुंबई केंद्रातून प्रथम क्रमांक मिळवत राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

